अणाव येथील आनंदाश्रमाला डायपर भेट; अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राबवण्यात आला उपक्रम*
*कणकवली दि.२९-:* तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने येथील उपजिल्हा रुग्णालयाला थर्मलगन तर अणाव येथील आनंदाश्रमाला डायपर भेट देण्यात आले. महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत हि भेट देण्यात आली. येथील उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. सी. एम. शिकलगार यांच्याकडे थर्मल गन सुपूर्द करण्यात आली. यावेळी तालकाध्यक्ष संजय घाडीगांवकर, जिल्हा पदाधिकारी नंदू उबाळे, विजय घाडी, मकरंद घळसासी तसेच अजित आंबेकर, योगेश रेडेकर, विवेक ठाकूर, सुहास हर्णे, स्वप्नील माळी, संजय पाध्ये आदी उपस्थित होते. यावेळी अणाव आनंदाश्रमालाही डायपर भेट देण्यात आले.
