*जिल्ह्यात होऊ घातलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ५२४ पदांना शासनाची मान्यता

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मान्यतेच्या इतर बाबींची देखील करावी पूर्तता; कृती समितीचे आवाहन

सावंतवाडी-: जिल्ह्यात होऊ घातलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासनाने आज वर्ग अ ते वर्ग ड च्या ५२४ पदाना मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी लागणाऱ्या ११८.५५ कोटी एवढ्या अंदाजित खर्चास देखील मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश सहसचिव शिवाजी पाटणकर यांनी काढले आहेत. जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीने मागील ४ वर्षांपासून जनजागरण अभियान राबविले आहे. त्यास जिल्ह्यातील नेतृत्वाने व मा मुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यावेळी त्यांच्याशी संपर्क साधला असता कृती समितीचे समन्वयक अँड श्यामराव सावंत म्हणाले की, ज्या प्रमाणे शासनाने जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी आणि आता पद निर्मिती करून वेतन व इतर खर्चास मान्यता देण्यासाठी तत्पर निर्णय घेतलेत त्याचप्रमाणे यापुढेही जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागास वर्ग करणे, निश्चित झालेली जागा नावावर करणे, वसतिगृह व इतर सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे ज्यामुळे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची मान्यतेसंदर्भातील आवश्यक बाबींची पूर्तता होईल, याबाबतही तत्पर निर्णय व्हावे असे विनम्र आवाहन त्यांनी केली आहे.

You cannot copy content of this page