कणकवलीत भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व अँटी रॅबीज लसीकरण मोहिम

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून मोहीम : ५६७ भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया

*💫कणकवली दि.२९-:* नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून कणकवली नगरपंचायत च्या वतीने राबविण्यात येत असलेल्या शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व अँटी रॅबीज लसीकरण मोहिमेत आजअखेर ५६७ भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. कोल्हापूर येथील संस्थेला हे काम देण्यात आले असून, त्यांच्या माध्यमातून सकाळच्या सत्रात भटके कुत्रे पकडण्याची मोहीम हाती घेण्यात येते. सातत्यपूर्ण मोहिमेमुळे कणकवली शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या पूर्वीपेक्षा कमी झाली असून नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page