संदेश पारकर यांनी घेतली नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट ; माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांची उपस्थिती
*💫कणकवली दि.२९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतीना प्राधान्याने विकासनिधी मिळावा तसेच कणकवली नगरपंचायतीला कायमस्वरुपी सिईओ मिळावा यासाठी शिवसेना युवानेते संदेश पारकर यांनी माजी राज्यमंत्री आमदार दिपक केसरकर यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी श्री.संदेश पारकर यांच्यासोबत वेंगुर्ला तालुकाप्रमुख बाळु परब, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, सुनिल डुबळे, सचिन वालावलकर आदी उपस्थित होते.
