*💫सावंतवाडी दि.२९-:* रुग्णांना लागणारी रक्ताची गरज भागवून रुग्णांचे प्राण वाचवणारी युवा राक्तदाता संघटना आता रुग्णवाहिकेची स्वरूपात गंभीर रुग्णांना वेळीच उपचार मिळवून देण्यासाठी पुढे सरसावली आहे. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांच्या संकल्पनेतून लोकांच्या सेवेसाठी हक्काची रुग्णवाहिका लोकसेवेत दाखल झाली आहे. गरजू, होतकरू रुग्णांना संकटकाळी मोफत सेवा देण्याचे काम ही संघटना करत आहे. कालच एका ८ महिन्याच्या तान्ह्या बाळाला वेळीच उपचार हवे असताना मध्यरात्री नंतर १ वाजता ऑक्सिजन सेवा असणारी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे त्या बाळाला योग्य वेळेत बांबुळी येथे नेऊन योग्य उपचार करण्यात आले आहेत. युवा रक्तदाता संघटनेची ही रुग्णवाहिका सेवा लोकांसाठी जीवनदायी ठरणार आहे. अगदी माफक दरात ही रुग्णवाहिका सेवा लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून संकटकाळी हाक देण्याचे आवाहन देव्या सूर्याजी यांनी केले आहे. यावेळी रुग्णवाहिकेसाठी हेमंत वागळे – ९४२००७९१०६/ ७५८८५६४६८५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
युवा रक्तदाता संघटनेची रुग्णवाहिका ठरणार लोकांसाठी जीवनदायी
