*केशवसूत कट्टातर्फे सलग १६ व्या वर्षी आयोजन
*💫सावंतवाडी दि.२९-:* सावंतवाडी येथील केशवसूत कट्टातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे यंदा सलग १६ व्या वर्षी ज्येष्ठ हार्मोनियम व आॅर्गनवादक स्व. पं. गोविंदराव पटवर्धन यांच्या पुण्यस्मरणार्थ रविवार ३१ जानेवारी रोजी कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी येथे सायंकाळी ५.३० ते ८ या वेळेत संगीत सभा कार्यक्रम आयोजित करण्याज आला. आहे. या कार्यक्रमात पं. तुळशीदास बोरकर यांचे शिष्य मयंक उदय टेंगसे (गोवा) यांचे सोलो हार्मोनियम वादन तसेच पं. हरीष दळवी, पं. प्रभुदेव सरकार पं. दिनकर पणशीकर, प्रसाद सावकार यांचे शिष्य डॉ. प्रदीप सरमोकादम यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होणार आहे. त्यांना राजेंद्र सिंग बाळ यांचे शिष्य साईश नायक दलाल हे तबला साथ करणार असून सूत्रसंचालन संजय कात्रे करणार आहेत. अभ्यास पूर्ण नाट्यपद सादरीकरण हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. रसिक बंधू भगिनींनी कोविड-१९ बाबतच्या शासनाच्या नियमांचे पालन करून उपस्थित राहण्याचे आवाहन चंद्रकांत घाटे मित्रमंडळ केशवसूत कट्टा सावंतवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
