कोळंब पुलानजीकचे बंद पथदीप सुरू करा

मालवण (प्रतिनिधी)

मालवण आचरा मार्गावरील कोळंब पुलावरील पथदीप अनेक दिवसांपासून बंद स्थितीत असल्याने पुलावर काळोखाचे साम्राज्य पसरले आहेत. रात्रीच्यावेळी या अंधारात पादचाऱ्यांना पुलावरून ये-जा करणे असुरक्षित व धोकादायक बनले असल्याने कोळंब पुलाच्या कोळंब बाजूकडील बंद पथदीप प्रशासनाने तातडीने सुरू कार्यवाही करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

मालवण आचरे मार्गावरील मालवण शहर अणि कोळंब गावाला जोडणाऱ्या कोळंब पुलावरील कोळंब गावाच्या बाजूकडील पथदीप मागील अनेक दिवसांपासून बंद स्थितीत आहेत. यामुळे सायंकाळनंतर पुलावरून घरी परतणारी शाळकरी मुले, मच्छि विक्रेत्या महिला, वृद्ध ग्रामस्थ तसेच महिला वर्गाला सायंकाळनंतर पुलावरून प्रवास करणे असुरक्षित बनले आहे. त्यातच काही दिवसांपासून मालवण शहर बाजूकडील हायमास्ट टॉवर सुद्धा बंद स्थितीत असल्याने कोळंब पूल परिसरात सायंकाळनंतर अंधाराचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूकडील बंद पथदीप तातडीने सुरू करावेत, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

You cannot copy content of this page