गोकुळाष्टमी निमित्त माऊली मतिमंद निवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मनसे कडून खाऊचे वाटप…

⚡सावंतवाडी ता.२०-: गोकुळाष्टमी निम्मित कोंडूरे येथील माऊली मतिमंद निवासी विद्यालय येथे मुलांच्या शाळेला मनसेच्या वतीने मुलांना खाऊ वाटप केले. त्यासोबत दोन ट्रिमर मशीन भेट म्हणून देण्यात आल्या व तेथील मुलांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या समस्यांचं निवारण करण्याचा शब्द मनसे उपस्थित मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला त्याचप्रमाणे मनसे तर्फे वेळोवेळी त्या ठिकाणी हवी असलेली मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार, आरोस विभाग अध्यक्ष मंदार नाईक, सावंतवाडी सचिव कौस्तुभ नाईक, तिरोडा विभाग अध्यक्ष संदेश शेट्ये, कळणे विभाग अध्यक्ष अभय देसाई, मुकुंद धरगळकर, शाखा अध्यक्ष मनोज कांबळी, मंदार सुभेदार आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page