श्री देव बांदेश्र्वर – भूमिका मंदिर परिसरात सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करणार…

प्रकल्पाची आज करण्यात आली पायाभरणी…

⚡बांदा ता.२०-; बांद्याचे आराध्य श्री देव बांदेश्वर – भूमिका व परिसरातील मंदिरात विद्युत रोषणाई व २४ तास प्रकाशयोजना उपलब्ध होण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. गोव्यातील उद्योजक तथा श्री देव बांदेश्वरचे भक्त सुवर्ण नारायण बांदेकर यांच्या माध्यमातून १६ लाख रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाची आज विधिवत पायाभरणी करण्यात आली.
या प्रकल्पमुळे बांदेश्वर व परिसरातील सर्व देवालये यांना पूर्णवेळ व कायमस्वरूपी सौरऊर्जा प्राप्त होणार आहे. यातून ८ किलोव्याट ऊर्जेची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पाची पायाभरणी उद्योजक सुवर्ण बांदेकर व त्यांच्या पत्नी सौ. बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी प्रकल्पचा आराखडा बनवून तात्काळ कामास प्रारंभ करण्यात येणार आहे. विजयादशमी दिवशी या प्रकल्पचे उदघाट्न करण्यात येणार आहे.
यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष सुभाष मोर्ये, अरुण मोर्ये, उमेश मोर्ये, संजय सावंत, अमोल सावंत, शरद सावंत, प्रकाश राऊळ, संतोष मोर्ये, संतोष तारी, पुरोहित रोहित कशाळीकर, प्रसाद हर्डीकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page