⚡कणकवली ता.२०-: कणकवली शहरातील उड्डाणपुलाखाली गेल्या तीन वर्षापासून काही वाहने बेवारसपणे उभी आहेत. या सर्व वाहनांवर जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय आज नगरपंचायत व पोलीस प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला.
शहरातील वाहतूक कोंडी आणि इतर प्रश्नांच्या अनुषंगाने नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावले तसेच नगरपंचायत अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. यात शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत विविध उपाययोजनांवर चर्चा झाली. या चर्चेत शहरातील उड्डाणपुलाखाली बेवारसपणे उभी करून ठेवण्यात आलेल्या वाहनांवर नगरपंचायत आणि पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून संयुक्त कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले.
