‘एमपीएससी’ 1395 पदांसाठी युनिक कणकवली येथे 15 दिवस मोफत शिकवणी

⚡कणकवली ता.२०-: जिल्ह्यातील एमपीएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 8 ऑक्टोबर रोजी होणारी गट ब , त्यानंतर होणारी 5 नोव्हें. 2022 ची गट क आणि आगामी राज्यातील मोठी तलाठी भरती ,पोलीस भरती (7000 पदे) व झेड.पी सरळसेवा भरती या सर्व परीक्षांची एकत्रित तयारी करून घेण्यासाठी सोमवार दिनांक 22 ऑगस्ट 2022 पासून मोफत नियमित आणि विकेंड लेक्चर्स घेतले जाणार आहेत.गट क च्या 595 पदांची 5 नोव्हें 2022 ला होणाऱ्या परीक्षेचा फॉर्म भरायची अंतिम तारीख सोमवार 22 ऑगस्ट 2022 आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी अवश्य फॉर्म भरावा.

युनिकच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये अनेक विद्यार्थी विविध खात्यांमध्ये सध्या कार्यरत आहेत. अशाच प्रकारे जिल्ह्यातील आणखी विद्यार्थ्यांनी सदर मोफत शिकवणी चा फायदा घेऊन यश मिळवावे आणि जिल्ह्यातील प्रशासकीय
भाग बनावे,असे आवाहन युनिक कणकवलीचे संचालक सचिन कोर्लेकर यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी युनिक अकॅडमी कणकवली 9689414974/9960658458 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page