शस्त्रक्रिया नोंदणी शिबिराचे आयोजन

⚡वेंगुर्ला ता.१२-: वेंगुर्ला येथील इर्शाद शेख फाऊंडेशन व वेंगुर्ला शहर काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय येथे भव्य शस्त्रक्रिया नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

  या शिबिरासाठी डेरवण येथील भ.क.ल.वालावलकर रुग्णालयाचे जनरल सर्जन, जनरल मेडिसीन, अस्थिरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, कान, नाक व घसा तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. वालावलकर रुग्णालय डेरवण तर्फे पिवळ्या व केशरी रेशनधारकांसाठी हर्निया, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, थायरॉईड, अल्सर, प्रोस्टेटग्रंथी, मूळव्याध, मुतखडे, चरबीच्या गाठी, नाक, कान, घसा शस्त्रक्रिया, कानाच्या पडद्याची शस्त्रक्रिया, नाकाचे हाड वाढणे, टॉन्सिल्स, महिलांच्या गर्भाशय शस्त्रक्रिया, मोतीबिदू शस्त्रक्रिया, इम्प्लांट रिमूव्हर आदी शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत.  

  अधिक माहितीसाठी विधाता सावंत (९४२२०७७५१५, ९५७९४२२६३१), प्रकाश डिचोलकर (९४२२४३६०१७, ७५५८३०९१००) यांच्याशी संफ साधावा. रुग्णांनी येताना जुने रिपोर्ट व रेशनकार्ड घेऊन यावे. तसेच शस्त्रक्रिया सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये वालावलकर रुग्णालय डेरवण येथे मोफत करण्यात येतील.
You cannot copy content of this page