प्रा वैभव खानोलकर
वेंगुर्ला प्रतिनिधी-वेंगुर्ल्याच्या इतिहासात डोकावताना डचांनी व्यापारासाठी वसवलेले वेंगुर्ला बंदाराला ऐतिहासिक महत्त्व आहे. साहित्य व नाट्य चळवळीची परंपरा वेंगुर्ला शहराला आहे. अध्यात्मिक, साहित्यिक व सांस्कृतिक योगदान देणारे केंद्र वेंगुर्ला होय. अनेक स्थित्यंतरे पाहत वेंगुर्ल्याने केलेली कामगिरी हे वेंगुर्ल्यातील संचित म्हणावे लागेल असे प्रतिपादन प्रा.वैभव खानोलकर यांनी केले.
बॅ.खर्डेकर महाविद्यालयात ‘आजादी का महोत्सव‘ व ‘हर घर तिरंगा‘ उपक्रमांतर्गत वेंगुर्ला शहराचा इतिहास यावर प्रा.वैभव खानोलकर व प्रा.सचिन परुळकर यांची व्याख्याने संपन्न झाली. यावेळी व्यासपिठावर प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, डॉ.बी.जी.गायकवाड, डॉ.प्रा.आनंद बांदेकर, प्रा.वामन गावडे उपस्थित होते. देश घडविण्यासाठी वेंगुर्ल्यतील व्यक्तींनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याची माहिती प्रा.परुळकर यांनी दिली. समाजात देशप्रेम व राष्ट्रभक्ती वृद्धिगत करण्याचे काम या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात होत आहे. यावेळी प्रा.डी.आर.आरोलकर, प्रा.एस.जी.चुकेवाड, प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर, प्रा.व्ही.एस.चव्हाण, डॉ.एम.एम.मुजूमदार, प्रा.राजाराम चौगले यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
