व्यसनमुक्ती बंधन व्यसनापासून रक्षण

नशाबंदी मंडळ आणि ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचा उपक्रम

कणकवली ता.१२-: नशाबंदी मंडळ शाखा सिंधुदुर्ग व ऑटो रिक्षा चालक मालक संघटना कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या व राखी पौर्णिमेच्या निमित्ताने व्यसनमुक्ती बंधन व्यसनापासून रक्षण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेविका मेघा गागंण, ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र ऊर्फ अण्णा कोदे, संतोष सावंत, हर्षदा वाळके, सौ अर्पिता मुबरकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व मान्यवर व आणी रिक्षा चालक – मालकांना राखी बांधून आणि औक्षण करुन सन्मान करण्यात आला.

You cannot copy content of this page