⚡कणकवली ता.१२-:
वैभववाडी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई यांनी कणकवली पंचायत समिती सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार पदभार स्वीकारला.यावेळी कणकवली पंचायत समिती गट विकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले.
मोहन भोई यांनी वैभववाडी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून काम करीत असताना आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. यावेळी गट शिक्षणाधिकारी श्री .गवस उपस्थित होते.
कणकवली पंचायत समिती सहाय्यक गट विकास अधिकारीपदी मोहन भोई
