⚡कणकवली ता.१०-: आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडेमध्ये “आझादी का अमृत महोत्सव ” अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.
प्रशालेत “आझादी का अमृत महोत्सव ” निमित्त १३ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक १० वाजता भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान असलेल्या क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे ,देशासाठी ,देश स्वातंत्र्य करण्यासाठी देशभक्तांनी केलेल्या त्यागाच्या जाणिवेतून राष्ट्रप्रेम,राष्ट्रीय भावना वाढीस लावते या हेतूने कार्यक्रमाचे नियोजन केले आहे,या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मान. विनोद कांबळे (उपविभागीय पोलीस अधिकारी ), कृष्णराज सातवशे (शाखा व्यवस्थापक युनियन बँक कणकवली) हे उपस्थित राहणार आहेत,यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रथमच तृतीयपंथी शासकीय कर्मचारी म्हणून नियुक्ती झालेल्या श्रीम.रिया आळवेकर यांचा विशेष सत्कार प्रशालेच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
