⚡कणकवली ता.१०-: सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडी पाठोपाठ कणकवली तालुक्यातील शिंदे गटाला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कणकवली तालुक्यातील त्यांच्या समर्थकांनी मुंबईत भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
ना.उदय सामंत यांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेऊन समर्थकांच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी जि. प. सदस्य संजय आग्रे, माजी सभापती संदेश पटेल, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, भास्कर राणे, बाळू पारकर, प्रशांत केणी, संदीप खानोलकर व इतर उपस्थित होते.
