आजगावला ग्राम स्वच्छता अभियान

विद्यार्थी, शिक्षकांनी केले श्रमदान

⚡सावंतवाडी ता.१० : तालुक्यातील आजगाव येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘ग्राम स्वच्छता अभियान’ राबविण्यात आले. यात लोक कल्याण शिक्षण संस्था, मुंबई संचलित, विद्या विकास अध्यापक विद्यालय व विद्या विहार इंग्लिश स्कूल, आजगाव येथील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तसेच सरपंच ग्रामसेवक व ग्रामस्थ सहभागी झाले होते. या सर्वांच्या श्रमदानाने आजगाव ग्राम पंचायत जवळील परिसर तसेच श्री देव वेतोबा मंदिराच्या परिसराची साफ सफाई करण्यात आली.

You cannot copy content of this page