सीईओ प्रजित नायर यांनी केले उद्घाटन;रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल , न्यू इंग्लिश स्कूल कसाल यांचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी ता १०
रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल व न्यू इंग्लिश स्कूल कसाल यांच्या संयुक्त विद्धमाने कनिष्ठ महाविद्यालय कसाल येथे ऐतिहासिक नाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, सामान्य प्रशासनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण, रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल चे जिल्हाध्यक्ष उदय जांभवडेकर तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक कुसगावकर शिक्षक वृंद उपस्थित होते.
कसाल महा विद्यालयतील या ऐतिहासिक नाणे प्रदर्शनात २०५ देशातील पूर्व कालीन नाणी ठेवण्यात आली आहेत. यामध्ये इंडोग्रीक, मुघल, चोळ, मराठा, कुशन, ते अनेक राजा महाराजांच्या कार्यकाळातील विविध प्रकारच्या चलनी नाण्यांचे तसेच स्वातंत्र्य काळापासूनच्या भारतीय चलनी नाण्यांचे व नोटांचे प्रदर्शन संपूर्ण इतिहासासहित मांडण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी ओमकार कदम या युवकाच्या छंदाचे कौतुक केले. यावेळी मनसे कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रदर्शनासाठी प्रभाकर सावंत, सिद्धांत सावंत, प्रथमेश सावंत, सिद्धांत परब, तसेच प्रशालेच प्रकाश नारकर यांचे सहकार्य लाभले असल्याचे यावेळी ओंकार कदम यांनी सांगितले.
