⚡कणकवली ता.१०-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने कणकवली नगरपंचायत मध्ये ९ ऑगस्ट रोजी सामूहिक राष्ट्रगान उपक्रम राबविण्यात आला. माजी आमदार व भाजप प्रदेश चिटणीस प्रमोद जठार, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन अतुल काळसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष समीर नलावडे, गटनेते संजय कामतेकर, कंझ्यूमर्स सोसायटी चेअरमन संदीप नलावडे, भाजप सरचिटणीस रवी शेट्ये, माजी नगरसेवक बंडू गांगण, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे रवींद्रनाथ मुसळे, भाजपा प्रसिद्धी प्रमुख बबलू सावंत, स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, किशोर धुमाळे, संदीप मुसळे, मनोज धुमाळे, सतीश कांबळे, ध्वजा उचले, रुजिता ताम्हणकर, निकिता पाटकर आदि उपस्थित होते. सामूहिक राष्ट्रगान नंतर आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत नियोजनात संदर्भातही चर्चा करण्यात आली.
कणकवली नगरपंचायतच्यावतीने सामूहिक राष्ट्रगान उपक्रम साजरा
