शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर : युवकांना नोकरी देणारे बनवले हा संशोधनाचा विषय : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नाव न घेता टोला
⚡सावंतवाडी ता.१०-: सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा मिळून कोकणाला तीन कॅबिनेट मंत्री पद मिळाली असून, ही मंत्रिपदे औटघटकेची तर नाहीत ना…? असा सवाल शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.
यावेळी ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यात पर्यटन मंत्री पद आल्याने अनेक बंद पडलेले पर्यटन प्रकल्प नव्या जोमाने सुरू होणार असून, त्याद्वारे अनेक रोजगार उपलब्ध होणार आहेत. तसेच सी वर्ल्ड पासून, सबमरीन सारखे अनेक प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याचा मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. जिल्ह्याला केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री पद मिळून वर्ष झाले परंतु, किती युवकांना नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बनवले हा संशोधनाचा विषय असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नाव न घेता टोला लगावला आहे.
