क्लिनर गंभीर जखमी;ट्रकने झाडाला थेट ठोकर घडला अपघात
⚡मालवण ता.०९-: चौके येथून कर्नाटक येथे चिरे घेऊन जाणाऱ्या चौदा टायरच्या एलपी ट्रकच्या (क्रमांक के.ए. ३५- ४११५) चालकाचा ट्रक वरील ताबा सुटल्याने रस्त्यालगत असणाऱ्या भल्या मोठ्या आंब्याच्या झाडाला तो धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालक अर्जुन ईश्वर नायकप्पोगाल (वय ३०, रा. नायकर ओनी यरगनवी ता. सौदती बेळगाव) हा जागीच ठार झाला असून क्लिनरने प्रसंगावधान राखून उडी मारल्याने त्याच्या कानाला गंभीर दुखापत झाली हा अपघात आज दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास कुणकावले कुपेरीची घाटी येथे घडला
दरम्यान, या अपघातात ट्रक मध्ये अडकलेला चालकाचा मृतदेह जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढून मालवण ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता.
चौक येथून कर्नाटक येथे चिरे वाहतूक करणारा ट्रक चौके कसाल मार्गावरील कुपेरीच्या घाटीत उतारावर भल्या मोठ्या झाडावर धडकल्याने अपघात झाला. या अपघातात ट्रकचालक अर्जुन ईश्वर नाईकप्पागोल याचा जागीच मृत्यू झाला. समोरून येणाऱ्या अन्य वाहनाला बाजू देण्याच्या नादात हा अपघात झाल्याचे कळते. अपघातानंतर चालकाचा मृतदेह बराच वेळ आतमध्ये अडकून पडला होता. ट्रक मधील चिरे बाजूला करून आत अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते शेवटी झाड व ट्रक मध्ये अडकलेला चालकाचा मृतदेह जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढला यावेळी मृतदेहाचे पूर्णतः तुकडे झाले होते. तर अपघातात क्लिनर गंभीर जखमी झाला आहे. पत्रा लागून त्याचा कान फाटला आहे. त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले आहे. सांयकाळी उशिरा ट्रक मधील चिरे बाजूला करून आत अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते शेवटी झाड व ट्रक मध्ये अडकलेला चालकाचा मृतदेह जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढून मालवण ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. यावेळी पोलीस निरीक्षक विजय यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, पोलीस हवालदार श्री. शिवगण, श्री. पेडणेकर आदी उपस्थित होते.
अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक खंडित झाली होती काही काळानंतर म्हणजेच सांयकाळी वहातूक पोलीसानी वहातूक सुरळीत केली
अपघात घडल्याचे वृत्त कळताच कुणकावळे सरपंच मंदार वराडकर,चौके सरपंच राजन गावडे यांच्यासह कट्टा दूरक्षेत्र पोलीसांसह वाहतूक पोलीस डी. एस. तारी, एम. बी. देऊलकर, नितीन शेट्ये, ए. एन. गायतोंडे, पी. पी. ओरसकर तसेच चिरेखाण व्यावसायिक, स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधीनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
