मेढा येथील काळबादेवीचा श्रावण जत्रोत्सव उत्साहात संपन्न

⚡मालवण ता.०९-: मालवण मेढा येथील श्री काळबादेवी मंदिराचा श्रावण महिन्यातील वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात मंगळवारी संपन्न झाला. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

यानिमित्त काळबादेवीची मूर्ती वस्त्रालंकार व फुलांची आरास करून सजविण्यात आली होती. तर मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दिवसभर पूजा अर्चा व धार्मिक विधी पार पडले. तर सायंकाळी भजन सादर झाले. यावेळी देवीच्या दर्शनासाठी दिवसभर भाविकांनी मंदिरात गर्दी करत देवीची खणा नारळाने ओटी भरत नवस बोलले व फेडले. तर रात्री बारापाच मानकरी गावकरी यांच्या उपस्थितीत देवीची नजर उतरवून जत्रोत्सवाची सांगता झाली.

You cannot copy content of this page