हरिनाम सप्ताहानिमित्त यंगस्टार मित्रमंडळ व नगरपंचायतीचे आयोजन
⚡कणकवली ता.०९-: कणकवली येथील
श्री देव काशीविश्वेश्वर मंदिरातील हरिनाम सप्ताहानिमित्त यंगस्टार मित्रमंडळ व कणकवली नगरपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने ‘भाव अंतरीचे हळवे’या सांगीतिक
कार्यक्रम येथील प.पू. भालचंद्र महाराज संस्थानामध्ये आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेविका मेघा गांगण यांच्या हस्ते झाले.
यावेळी काशीविश्वेश्वर मंदिराच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अँड. प्रवीण पारकर, यंगस्टार मित्रमंडळाचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे, भरत
उबाळे, नंदू आळवे,बाळा सापळे, गजानन उपरकर,श्रीरंग पारगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आदर्श संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘भाव अंतरीचे हळवे’ हा सांगीतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यात विद्यार्थ्यांनी भक्तीगीत, भावगीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.हा संगीत कार्यक्रम पाहण्याठी रसिकांनी देखील हजेरी लावली.
