लक्झरी बस घेऊन मुंबई जात असताना कराडनजीक अपघातात युवकाचा मृत्यू

⚡कणकवली ता.०९-: कणकवली तालुक्यातील वरवडे फौजदारवाडी येथील जयराम उर्फ मनोज मधुकर सावंत वय ४५ यांचा मुंबई येथे जात असताना कराड येथे झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. मनोज सावंत हे आपल्या ताब्यातील लक्झरी बस घेऊन मुंबईकडे प्रवाशी घेवून जात होते. सिंधुदुर्गातून मुंबईच्या दिशेने जात असताना कराड नजीक लक्झरी बस वरील त्यांचा ताबा सुटला आणि ती झाडावर आदळली. यात त्यांचा दुर्दैव अंत झाला.

ही घटना मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास घडली. यात शार्दुल सावंत राहणार वरवडे फौजदारवाडी हा युवक जखमी झाला आहे.
मनोज मधुकर सावंत हे भाजपचे उपतालुका अध्यक्ष सोनू सावंत यांचे बंधू होत. मनोज सावंत हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. मनोज सावंत यांच्या अपघाती निधनाची वार्ता कणकवलीत कळतात सर्वत्र हळद व्यक्त केली जात आहे
मनोज सावंत हे व्यवसायाने लक्झरी बस चालक होते सिंधुदुर्ग ते मुंबई असा लक्झरीतून प्रवाशांना ने आण करण्याचा व्यवसाय होता ते नेहमीच हा प्रवास करत असत. कोल्हापूर मार्गे कराड मार्गे मुंबई असे जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला.

You cannot copy content of this page