स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्तुत्य उपक्रम
⚡सावंतवाडी ता.०९-: : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सोमवार दिनांक ९ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून ओटवणे नंबर ३ (गवळी वाडी) या प्रशालेच्या शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, विद्यार्थी वर्ग, शाळेचे हितचिंतक, तसेच शिक्षक वर्गातर्फे गवळी वाडीतील ज्येष्ठ महिला नागरिक लता मनोहर दामले (काकी) यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सारिका दशरथ शृंगारे व उपाध्यक्षा संचिता कृष्णा चिले यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या घरी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या वेळी उज्वला बुराण, पूर्वी बुराण, सुविधा शृंगारे ,पूर्वा चिले ,सुरेखा बुराण, सुजाता बिरोडकर, मोहन बुराण, बालवाडी शिक्षिका वैशाली कोटकर, दीक्षा शृंगारे उपस्थित होते. तसेच शाळेचे व बालवाडीचे विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहप्रभा वैज यांनी केले तर प्रशालेच्या शिक्षिका सुरेखा चव्हाण यांनी आभार व्यक्त केले.
