स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देवगड येथे आयोजित स्वराज्य महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

भारत माता की जय,वंदे मातरम घोषणांनी देवगड शहर दुमदुमले

⚡देवगड ता.०९-: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत देवगड किल्ला आयोजित केलेल्या स्वराज्य महोत्सवास नागरिक संस्था, विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या निमित्त देवगड तहसीलदार कार्यालय ते देवगड किल्ला या मार्गावर विशेष पदयात्रा काढण्यात येऊन त्यात दुचाकी स्वारांची उपस्थिती लक्षणीय होती.

९ ऑगस्ट २०२२ रोजी ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून देवगड तालुक्यातील नागरिकांच्या उपस्थितीत सकाळी ८ वाजता पदयात्रा मोटारसायकल फेरी तहसील कार्यालय ते देवगड किल्ला पदयात्रा ऐतिहासिक , देवगड किल्ला पर्यंत काढण्यात आली महिला ढोल पथक,घोषणा तिरंगी फुगे यांनी सारा देवगड परिसर देशभक्तीने न्हाऊन निघाला होता. १०.२० ते १०.४० नागरिकांना भारताच्या नकाशा प्रतिकृती मध्ये तिरंग्यातील तीन रंगाप्रमाणे उभे करण्यात येऊन ११वाजता देवगड किल्ला येथे राष्ट्रगीताचे समुह गायनपार पडले या सोहळ्याला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर,माजी आमदार अजित गोगटे, नगराध्यक्षा साक्षी प्रभू,उपनगराध्यक्ष मिताली सावंत ,सर्व नगरसेवक नगरसेविकाउपमुख्यकार्यकरी अधिकारी श्री तनपुरे विनायक ठाकूर,उपविभागीय अधिकारी
वैशाली राजमाने देवगड तहसीलदार मारुती कांबळे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे,पोलीस गटविकास अधिकारी अरुण चव्हाण,नगरपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गव्हाणे,गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात,देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष निशिकांत साटम,प्राचार्या सुखदा जांबळे प्राध्यापक, शिक्षक,वर्ग अप्ससर्व नागरीक उपस्थित होते सकाळी ११.५ ते ११ .३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले, त्यामध्ये शेठ म. ग. हायस्कुल देवगड देश भक्ती गीत , इग्लीश मिडीयम स्कुल देवगड देश भक्तीपर गीत , देवगड कॉलेज ग्रुप डान्स , आर्ट सर्कल देवगड देश भक्ती पर गीत , सौ . मनस्वी घारे देश भक्तीपर गीत , तसेच ११ .३५ वाजता स्वातंत्र सैनिकांचे स्मरण यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांचा सत्कार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला तसेच महसूल ,पोलीस, पंचायत समिती,महाविद्यालय,शाळा,पत्रकार प्रतिनिधींचा सत्कारही करण्यात आला, ११ .४५ वाजता तीन रंगातील फुगे हवेत सोडण्यात आले ,११ .५० वाजता अल्पोपहार व समारोप व १२ वाजता चित्ररथाचे मान्यवरांचे हस्ते उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. .
देवगड मधील सर्व घटक पहिल्यांदाच या उपक्रमाच्या माध्यमातून एकत्र आले होते

       या उपक्रमात देवगड तालुक्यातील नागरिकांनी पुरुषांनी सफेद शर्ट किंवा टीशर्ट व पॅन्ट ,पांढरी टोपी तसेच महिलांनी केशरी किंवा  हिरव्या साडया किंवा ड्रेस असल्यास हिरव्या ओडणी किंवा  केशरी ओडणी  परीधान करून उपस्थिती दर्शविली होती.
You cannot copy content of this page