⚡बांदा ता.०८-: ‘एकच नारा एकच नारा हर घर झंडा हर झंडा’ बांदा ग्रामपंचायत व जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत सायकलवरून बांदा गावातून जनजागृती फेरी काढून लोकांना घरोघरी तिरंगा झेंडा लावण्याबाबत आवाहन करण्यात आले. या उपक्रमात पावसाची तमा न बाळगता बांदा ग्रामपंचायतीचे सदस्य व बांदा केंद्र शाळचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
सरपंच अक्रम खान , ग्रामपंचायत सदयस जावेद खतीब , बाळू सावंत , राजेश विर्नोडकर , रिया अल्मेडा , मंगल मयेकर , स्वप्नाली पवार , शिक्षक बी डि पाटील , व सर्व कर्मचारी उपस्तिथ होते
