स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत
मालवण नगरपरिषदेत समुह राष्ट्रगान

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०८-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त मालवण नगरपरिषदेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे समुह राष्ट्रगान गायन. 9 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता मालवण शहरात समुह राष्ट्रगान गायनाचा कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती मालवण नगरपरिषदेतर्फे देण्यात आली आहे.

या कार्यक्रमामध्ये सर्व मालवण वासियांनी सकाळी 11 वा. जेथे असतील तेथून सहभागी व्हावयाचे आहे. नागरिकांच्या सोयीसाठी 10.55 वा. पहिला भोंगा होणार आहे. त्यानंतर 10.59 वा. दुसरा भोंगा होणार आहे. दुसऱ्या भोंग्यानंतर लगेचच राष्ट्रगान सुरु होणार आहे. तरी सर्व मालवण वासियांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन मालवण नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.
You cannot copy content of this page