देवगड महाविद्यालयात “काव्य लहरी” काव्य वाचन, लेखन स्पर्धा

जिल्हास्तरीय स्पर्धेत स्वरचित मराठी काव्य असणे बंधनकारक

देवगड
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आणि कविवर्य वसंत बापट आणि कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून देवगड महाविद्यालयातील मराठी भाषा विभागाने ‘काव्यलहरी’ या जिल्हास्तरीय स्वरचित मराठी काव्य लेखन आणि वाचन स्पर्धेचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या स्पर्धेची अंतिम फेरी शुक्रवार दिनांक ५ ऑगस्ट,२०२२ रोजी, सकाळी ठीक ११ वाजता गुरुदक्षिणा सभागृह, शेठ म.ग.हायस्कूल, देवगड येथे संपन्न होते आहे. या स्पर्धेस जाणकार प्रेक्षक म्हणून आपण उपस्थित राहून नवकविंना प्रोत्साहन द्यावे आणि कवितांच्या सादरीकरणाचा आस्वाद घ्यावा.

You cannot copy content of this page