माजी सरपंच चंदन पांगे यांच्या प्रयत्नांना यश
⚡मालवण ता.०४-: पहाटे कणकवली वरुन आणि दुपारी मालवण येथून आचरे भागात येणाऱ्या पुर्वी सुरू असलेल्या एसटी फेरया मधल्या काळात बंद झाल्या होत्या. याबाबत आचरा माजी सरपंच चंदन पांगे यांनी पाठपुरावा करून सदर बस फेरया बुधवार पासून सुरू झाल्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.यासाठी सहकार्य केलेल्या कणकवली आगार प्रमुख आणि मालवण आगार प्रमुख यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.
कणकवली वरुन आचरा भागात येण्यासाठीशाळेच्या मुलांसाठी असणारी सकाळी सहाची कणकवली आचरा मालवण एसटी फेरी बंद असल्याने आचरा भागात येणाऱ्या मुलांना त्रासाचे ठरत होते.या द्रूष्टीने सदर फेरी सुरू झाल्याने शाळेच्या मुलांसाठी सोईचे बनले आहे. तसे दुपारी दोन वाजता मालवण वरुन आचरा येथे येणारी मालवण आचरा एसटी फेरी हिर्लेवाडी वायंगणी करून बांदिवडे मसुरे वरुन पुन्हा मालवणला जाणार आहे. सदर फेरयांचा प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन चंदन पांगे यांनी केले आहे.
