मातोंड ग्रामपंचायतची नवीन इमारत नागरिकांच्या सेवेत दाखल

सरपंच जानवी परब यांच्या हस्ते झाला शुभारंभ

वेंगुर्ला: तालुक्यातील मातोंड ग्रामपंचायत च्या नुतन ग्रामसचिवालयाचे उदघाटन आज (४ ऑगस्ट) सरपंच जानवी परब यांच्या हस्ते फित कापून व फलकाचे अनावरण करून करण्यात आले.
जनसुविधा तसेच १४ वा व १५ वा वित्त आयोग निधीतून सुसज्ज अशा मातोंड ग्रामसचिवालयाची उभारणी करण्यात आली आहे. आणि आज या इमारतीचे उदघाटन सरपंच सौ परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पं स माजी उपसभापती यशवंत परब, पेंडूर सरपंच गीतांजली कांबळी, तुळस सरपंच शंकर घारे, सोसायटी चेअरमन मकरंद प्रभू, तलाठी पंडित गुरव, तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम परब, माजी सरपंच उदय परब, नितीन परब, जेष्ठ मार्गदर्शक दादा परब- म्हालटकर, रविकिरण परब, उपसरपंच सुश्मिता परब, तुळस उपसरपंच जयवंत तुळसकर, मातोंड ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद इंगळे, मातोंड ग्रा प सदस्य सुभाष सावंत, वासुदेव कोंडये, दयानंद वेंगुर्लेकर, अस्मिता परब, सीताराम जाधव, सुवर्णलता जबडे, सुविधा नेमण, महानंदा घाडी, पेंडुर ग्रा प सदस्य निलेश वैद्य, तुळस ग्रा प सदस्य चंद्रे परब, सोसायटी संचालक ज्ञानेश्वरी केळजी, एम जी मातोंडकर, वसंत खाजणेकर, पेंडुर माजी सरपंच संतोष गावडे, कमलेश गावडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, निवृत्त केंद्रप्रमुख रावजी परब, डॉ कांडरकर, जगदीश परब, आनंद परब, सुखाजी परब, नंदकिशोर परब, राहुल प्रभू, बबलू पेडणेकर, प्रशांत परब, यांच्यासाहित मातोंड गावातील प्रतिष्ठित मंडळी, ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायत नुतन इमारती साठी विनामूल्य जमीन देणारे कै देवराव हिरे परब कुटुंबियांच्या वतीने त्यांचे सुपुत्र अविनाश परब यांचा शाल श्रीफळ व पुष्प देऊन सरपंच सौ परब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार दिपेश परब यांनी केले. यानंतर ग्रामपंचायत इमारतीमध्ये सत्यनारायण महापूजा संपन्न झाली.

You cannot copy content of this page