कासार्डे येथे माजी आम. प्रमोद जठार मित्रमंडळाच्यावतीने दहीहंडी

दहीहंडी फोडणाऱ्या पथकास रोख रु १,११,१११ रकमेसह आकर्षक कोकण दूध चषक

⚡कणकवली ता.०४-:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाची दहीहंडी समजल्या जाणाऱ्या  कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील भाजपा प्रदेश चिटणीस तथा माजी आम. प्रमोद जठार मित्रमंडळाच्यावतीने शुक्रवार १९ ऑगस्ट २०२२  रोजी दुपारी २ ते रात्रौ १० या वेळेत गोपाळकाल्यानिमित्त कासार्डे तिठा येथील महामार्गनजीक  पटांगणामध्ये दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.जास्तीत जास्त थर लावू दहीहंडी फोडणाऱ्या पथकास रोख रु १,११,१११ रकमेसह आकर्षक कोकण दूध चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

या मंडळाचे हे  १० वे वर्ष असून यावेळी विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडी उत्सवामध्ये सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यातील गोविंदा पथकांना सहभागी होता येईल. 
         
ग्रामीण भागातील गोविंदा पथकांना या दहीहंडी उत्सवात सहभागी होता यावे, त्यांना यातून आनंद,उत्साह, व आपले कौशल्य दाखविता यावे त्यातूनही अनेक नवीन गोविंदा पथके निर्माण होऊन त्यांना प्रोत्साहन व बक्षिसे मिळाविता यावीत या उद्देशाने  सिंधुदुर्ग व रत्नागिरी अशा दोन जिल्ह्यातील या गोविंदा पथकांसाठी दहीहंडीचे  आयोजन करण्यात आले आहे.

याप्रसंगी आठ थरांचे मनोरे रचून दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला रोख रु १ लाख ११  हजार १११  रुपये व  आकर्षक कोकण दूध चषक देण्यात येणार आहे.तर यावेळी चार थरांची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना रोख १ हजार १११ रुपये, पाच थरांची सलामी देणाऱ्यासाठी २ हजार २२२ रुपये,सहा थरांची सलामी देणाऱ्यासाठी ३ हजार ३३३ रुपये, सात थरांची सलामी देणाऱ्यासाठी ४ हजार ४४४ रुपयेव प्रत्येकी आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येईल.यावेळी डी जे , ढोलपथकांच्या  गजरासह सायं ४ वाजल्यानंतर खास रसिक प्रेक्षकांसाठी सध्या महाराष्ट्र  व महाराष्ट्राबाहेर गाजतं असलेला कोल्हापूर येथील कुंभार बंधु प्रेझेन्टस  ऑर्क्रेस्ट्रा धडाका डान्स म्युझिकल नाईट हा जुन्या नव्या मराठी-हिंदी  रिमिक्स, दिलखेचक लावण्या,अत्याधुनिक साउंड सिस्टीम- स्पेशल लेझर लाईट इफेक्टस, वन्समोअर  नृत्यगीतांचा जबरदस्त हंगामा- व्हरायटी शो असलेला बहारदार कार्यक्रमासह भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी केन्द्रीय उद्योगमंत्री नाम.नारायण राणे, प्रदेश  सचिव निलेश राणे आ.नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन  
आदी नेत्यांसह भाजपा  प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार प्रमोद जठार व जिल्हयातील विविध भाजपचे नेते पदाधिकारी,कार्यकर्ते व गाव मानकरी उपस्थित राहणार आहेत.तरी या भव्य दहीहंडी उत्सवामध्ये सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हयातील गोविंदा पथकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे यासाठी इच्छुकांनी  माहितीसाठी व नावनोंदणीसाठी प्रमोद जठार मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रसाद जाधव मोबा ९४०३२८९००५ अथवा श्री  रोहित महाडीक  भाजप कार्यालय कासार्डे ७०६६९३१०५३ येथे संपर्क साधावा असे आवाहन प्रमोद जठार  मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे 

You cannot copy content of this page