आव्हानांना सामोरे होण्यासाठी खंबीर व्हा! – सीमा मराठे

⚡वेंगुर्ला ता.०९-: आयुष्यातील नविन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मेहनत, कष्ट करुन मनाने खंबीर व्हा, असे मार्गदर्शन किरात ट्रस्टच्या सचिव आणि साप्ताहिक किरातच्या संपादक सीमा मराठे यांनी विद्यार्थ्यांना केले.

  अणसूरपाल हायस्कूलमधील एसएससी मार्च २०२२ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यया विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सीमा मराठे यांनी भविष्यातील आव्हानांसंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अणसूरपाल विका मंडळ, मुंबई संस्थेचे अध्यक्ष आत्माराम गावडे, शालेय समिती चेअरमन एम.जी.मातोंडकर, संस्था पदाधिकारी देवू गावडे, दिपक गावडे, दत्ताराम गावडे यांच्यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते. संस्था सचिव लिलाधर गावडे यांनी कृषी उद्योगातून रोजगार मिळविण्याविषयी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक शैलजा वेटे यांनी प्रास्ताविक केले. अक्षता पेडणेकर यांनी बक्षिस व अहवाल वाचन केले. तर राजेश घाटवळ यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.
You cannot copy content of this page