आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर अवतरला वैष्णवांचा मेळा

⚡वेंगुर्ला ता.०९-: आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रखुमाई व संतमहंतासाहित वेंगुर्ल्यात वैष्णवांचा मेळा अवतरला. या वैष्णवांच्या मेळ्याने ग्रंथदिंडी काढत विठ्ठल नामाचा गजर केला.

  येथील प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलच्यावतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून ग्रंथदिंडी आयोजित केली होती. स्कूलमधील मुलांनी विठ्ठल रखुमाई, संत तुकाराम, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई व वारकरी यांची वेशभूषा साकारत ग्रंथदिंडीत सहभाग घेतला. या ग्रंथदिंडी वेळी विठ्ठलाच्या गजरात रिगण, फुगडी असे कार्यक्रम सादर करण्यात आले. ग्रंथदिंडी यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका मिताली होडावडेकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी परिश्रम घेतले.
You cannot copy content of this page