जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या दोन विद्यार्थिनींची निवड

⚡सावंतवाडी ता.०९सहदेव राऊळ-: जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या दोन विद्यार्थिनीनी निवड करण्यात आली आहे.

यात इयत्ता सहावीमधील विद्यार्थीनी दिक्षा सतीश राऊळ (रा. मळगांव) व तळवडे येथील विद्यार्थीनी ईशा राजेश मेस्त्री यांची निवड झाली आहे. या दोन्ही विद्यार्थीनी इयत्ता पाचवीमधून जवाहर नवोदय विद्यालय ची प्रवेश परीक्षा दिली होती. या दोन्ही विद्यार्थीनीनी कोणतेही शिकवणी वर्ग न घेता प्रवेश परीक्षेला बसून हे यश मिळवले आहे.

त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल मळगाव ऐक्य वर्धक संघ मुंबई संचालित मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवचे संस्था अध्यक्ष मळगावकर, तसेच सचिव आर. आर. राऊळ, खजिनदार नंदकिशोर राऊळ, कायदेविषयक सल्लागार विरेश राऊळ, शाळा समिती चेअरमन मनोहर राऊळ, तसेच प्रशालेचे मुख्याध्यापिका सौ. श्रद्धा सावंत व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्गाकडून अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page