⚡सावंतवाडी ता.०९सहदेव राऊळ- : आरोंदा भटपावणी येथील आरोंग्य केंद्रातील आरोग्य सेविका सुप्रिया महादेव राणे यांनी गेल्या ७ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधित दिलेल्या सेवेबद्दल भटपावणी विकास मंडळ आणि आग्राळवाडी ,भटपावणी ग्रामस्थ यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
आरोग्य सेविका सुप्रिया राणे यांच्या निरोप समारंभाच आयोजन करण्यात आला होत.
कार्यक्रमा दरम्यान ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती सौ.राणे यांच्या कामाची पोच पावती दाखवत होती. राणे आणि त्यांचे पती माजी सैनिक महादेव राणे यांचं शाल आणि श्रीफळ देऊन तर सौ.राणे यांची साडी देऊन ओटी व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष विद्याधर नाईक, आरोग्य सेवक सावंत भोसले, ग्रा. प. सदस्य नरेश देऊलकर, गोविंद केरकर, मैथली नाईक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुदास नाईक यांनी तर आभार ग्रा.प.सदस्य गोविंद केरकर यांनी मानले.
