वामनाश्रम स्वामींचे आगमन ११ जुलै रोजी होणार; रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन

⚡कणकवली ता.०९-: श्री श्री श्री वामनाश्रम स्वामी महाराज यांचा १९ वा चातुर्मास व्रत सोहळा कणकवली येथे होत आहे. स्वामीचे आगमन ११ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता बांदा येथे होणार आहे .

बांदा येथे स्वामीचे स्वागत सिंधुदुर्ग जिल्हा बांधवांच्यावतीने करण्यात येणार असून नंतर रॅलीने स्वामीना घेऊन कणकवली येथे चातुर्मास स्थळी येणार आहोत सर्वांनी फोर व्हीलर गाडी घेऊन रॅलीत सहभागी व्हावे .ज्यांना बांदा येथे येणे शक्य आहे त्यांनी बांदा येथे यावे. ज्यांना वाटेत रॅलित सहभागी व्हायचे आहे त्यांनी तसे कळवावे.इतरांनी कणकवली येथे वागदे गणपती मंदिर येथे फोर व्हीलर घेऊन सायंकाळी 4.30 वाजता उपस्थित रहावे . स्वामीच्या स्वागताच्या निमित्ताने वैश्य समाजाची एकजूट दाखविण्यासाठी . जे समाज बांधव या रॅलीत सहभागी होवू इच्छितात त्यांनी आपली नावे श्रीकृष्ण नानचे -9421148853 आणि श्री उमेश वाळके 9420209600 येथे 11 जुलै पूर्वी कळवावी . असे आवाहन चातु र्मास सेवा समिती सिंधुदूर्ग यांनी केलेले आहे

You cannot copy content of this page