कलाशिक्षक बी.जी. सामंत यांनी ग्रेड परीक्षांमधील अडचणींबाबत वेधले कलासंचालकांचे लक्ष

⚡मालवण ता.०९-: कलासंचालक श्री. विश्वनाथ साबळे यांनी जे कलासंचालनालय मुंबई येथे महाराष्ट्रातील कलाशिक्षणाच्या शालेय स्तरावरील समस्या व शासकीय ग्रेड परीक्षा यासंबंधी आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघाच्या वतीने शालेय स्तरावरील समस्यांचे निवेदन देण्यात आले. उपमुख्य समालोचकांच्या वतीने मालवण येथील टोपीवाला हायस्कूलचे कलाशिक्षक बी.जी. सामंत यांनी ग्रेड परीक्षांमध्ये येणाऱ्या अडचणी व त्यावर करायच्या उपाययोजना यावर विस्तृत निवेदन सादर करत कलासंचालकांचे लक्ष वेधले.

यावेळी सर्व संघटनांचे प्रतिनिधी व ग्रेड परीक्षेचे उप मुख्य समालोचक यांनी शालेय स्तरावरील समस्या यांचे निवेदन केले. सर्व मुद्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. कलाशिक्षकाना प्रशिक्षण विभागवार राज्य प्रदर्शने
भरवुन मुलांना नविन काही बघण्याची संधी निर्माण करण्याविषयी कलासंचालक श्री. साबळे यांनी विशेष आस्था दाखवत कलाशिक्षकांच्या समस्यांचे एकत्रिकरण करून शालेय शिक्षण विभागाशी पत्र व्यवहार करून पाठपुरावा करण्याचे अभिवचन दिले. कलाक्षेत्राला आलेली मरगळ झटकण्याचासाठी महाराष्ट्र राज्याचे नविन कलासंचालक काही करू पाहत असल्याने यासाठी कलाशिक्षकानी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

You cannot copy content of this page