⚡वेंगुर्ला ता.०९-: परबवाडा येथील आयोजित केलेल्या ‘एक दिवस बळीराजासाठी‘ या उपक्रमांतर्गत रानभाज्या, गावठी भज्या, बियाणे, मसाल्याचे पदार्थ, कडधान्ये, सेंद्रिय खत, शेतीतील पारंपरिक अवजारे, कलमे व रोपे याचे कृषी प्रदर्शन परबवाडा शाळा नं.१ मध्ये भरविण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी कृषी विस्तार अधिकारी प्रिया कोरगावकर यांनी कृषीविषयक आधुनिक शेती विषयी मार्गदर्शन केले. गटविकास अधिकारी विद्याधर सुतार यांनी बदलत्या शेतीविषयक धोरणाबाबत माहिती दिली. तर गटविकास अधिकारी गटशिक्षण अधिकारी संतोष गोसावी यांनीही शेती विषयक मार्गदर्शन केले. यावेळी सरपचं विष्णू परब, उपसरपंच हेमंत गावडे, विस्तार अधिकारी सुनिता भाकरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदिप परब, गटसाधन केंद्रातील सर्व कर्मचारी, पालक व विद्यार्थी आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक अनिता रॉड्रिग्ज यांनी सर्वांचे स्वागत केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झोरे यांनी केले.
