मुलांना दिले भात लावणीचे प्रात्यक्षिक

वेंगुर्ला ता.०९-: परबवाडा शाळा व परबवाडा ग्रामपंचायतीच्यावतीने जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचा ‘एक दिवस बळीराजासाठी‘ हा उपक्रम परबवाडा येथे घेण्यात आला.

  या कार्यक्रमासाठी वेंगुर्ला गटविकास अधिकारी विद्याधर सुतार, सरपंच पपू परब, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, उपसरपंच हेमंत गावडे, शिक्षण विस्तार अधिकारी सुनिता भाकरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप परब, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष नितीन बांदेकर, संदेश परब, वेंगुर्ला गट साधन केंद्रतील सर्व विषय शिक्षक, मुख्याध्यापक अनिता रॉड्रिग्ज, ग्रामसेवक प्रविण नेमण, ग्रामपंचायत सदस्य संतोष सावंत, संजय माळगावकर, अर्चना परब, कृतीका साटेलकर, ग्लानेस फर्नांडीस, सखी पवार, महिला बचत गटच्या गौरी सावंत, डिसोझा, अनुजा परब, नयना सावंत, शीतल नाईक, विशाका पवार, प्राची पवार, स्वरा देसाई, निता पवार, दर्शना परब, सागर आवळेगावकर, विशाल जाधव, अक्षय परब, सायमन आल्मेडा, सिद्धेश कपडोसकर, युवराज नाईक, पार्थ सावंत आदी उपस्थितीत होते. मुलांना भातशेतीचे नांगरणी व प्रेरणी संदर्भात माहित व्हावी म्हणून त्यांना कणकेवाडीत बांधावर नेऊन त्यांच्याकडून भात लावणीचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. यासाठी भोले परब व शेखर नाईक यांचे सहकार्य मिळाले.
You cannot copy content of this page