⚡कणकवली ता.०६-: निरंकारी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून मातोश्री मंगल कार्यालय, कणकवली येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले. यावेळी 33 जणांनी रक्तदान केले.
कणकवली तहसीलदार आर.जे. पवार यांनी शिबिराचे उदघाटन केले. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले, संत निरंकारी मिशन हे सेवातत्पर वाल मिशन असून यांच्या माध्यमातून होत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. नायब तहसिलदार असल्यापासून निरंकारी मंडळाचे कार्य जसे स्वच्छता अभियान आणि नैसर्गिक आपत्ती वेळी प्रशासनासोबत जनतेची सेवा पहातोय हे भक्त निष्काम भावनेने ही सेवा करत असतात.या समाजपयोगी कार्यात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व शुभेच्छा दिल्या.
जिल्हा रक्तपेढीच्या डॉ. प्राची तनपुरे व त्यांच्या ६ जणांच्या टीमने रक्त संकलित केलें.संत निरंकारी मंडळाच्या कणकवली सेक्टरचे संयोजक यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. या वेळी निरंकारी भक्त व स्थानिक नागरिक उपस्थित होते. शिबीर यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी सेवादल विभागाने बहुमोल सहकार्य केले.
