मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन करण्यात आला सन्मान

⚡सावंतवाडी ता.०६सहदेव राऊळ -: मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव मधील मार्च २०२१-२२ या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन पार पडले.

यावेळी प्रथम क्रमांक प्राप्त प्रार्थ प्रशांत राऊळ, द्वितीय क्रमांक प्राप्त सेजल बापू शिरोडकर व तृतीय क्रमांक प्राप्त प्रणव प्रवीण गोसावी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ, व सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे प्रमुख विक्रांत सावंत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रद्धा सावंत ,पर्यवेक्षक फाले सर ,जेष्ठ शिक्षक कदम सर मोर्ये मॅडम, पत्रकार सुखदेव राऊळ आदी उपस्थित होते. राष्ट्रीय खेळाडू साहिश तळणकर याचेही पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

विक्रांत सावंत म्हणाले, आपली कोकणातील मुले एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घेत नाहीत. या स्पर्धा परीक्षां बाबत मार्गदर्शनही मिळत नाही. विद्यार्थ्यांना या परीक्षांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी महेंद्र पेडणेकर यांनी अकॅडमी सुरू केली, ही बाब कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. रुपेश राऊळ म्हणाले की, मळगाव प्रशाला ही जिल्ह्यातील नावाजलेली असून या प्रशाळेमध्ये विविध उपक्रम राबविले जातात.

त्यामुळे मुख्याध्यापिका सौ. सावंत मॅडम यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी तुम्हा विद्यार्थ्यांना कोणतीही मदत हवी असल्यास आम्ही सदैव तयार असल्याचे सांगितले. महेंद्र पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये योग्य दिशा मिळावी यासाठी करिअर विषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रद्धा सावंत यांनी तर सूत्रसंचालन व आभार विठ्ठल सावंत केले. यावेळी एस. एस. सी. गुणवंत विद्यार्थ्यांसहीत सद्या दहावीत शिकत असलेले विद्यार्थी -विद्यार्थीनी उपस्थित होते.

You cannot copy content of this page