खासदार विनायक राऊत उद्यापासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

⚡सिंधुदुर्ग दि.०६-: रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार तथा शिवसेना गटनेते,व शिवसेना सचिव श्री.विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे..

गुरुवार दिनांक ०७ जुलै २०२२ रोजी

सकाळी ११.०० वाजता – मौजे कुवळे,तालुका देवगड येथे BSNL टॉवर लोकार्पण.

दुपारी १.३० वाजता – पडेल,पुरळ,वाडा आदी १२ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विजयदुर्ग प्रादेशिक नळपाणी योजना संदर्भातील आढावा बैठक.
स्थळ – पाळेकर वाडी ग्रामपंचायत कार्यालय.

सायंकाळी ४.०० वाजता – देवगड तालुका शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक बैठक. स्थळ – डायमंड (इंद्रप्रस्थ हॉल) सातपायरी देवगड.

सायंकाळी ७.०० वाजता – वैभववाडी तालुका शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक बैठक
स्थळ-:शासकीय विश्रामगृह, वैभववाडी

शुक्रवार दिनांक ०८ जुलै २०२२ रोजी

दुपारी १२.3० वाजता– केर,मोर्ले,हेवाळे (तालुका दोडामार्ग) हत्ती बाधित क्षेत्राची पहाणी

दुपारी ३.०० वाजता-दोडामार्ग तालुका शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक बैठक.
स्थळ दोडामार्ग

शनिवार दिनांक ०९ जुलै २०२२ रोजी

सकाळी ११.०० वाजता-शिवसेना जिल्हा कार्यकारणी,
स्थळ – वैश्य भवन सावंतवाडी.

रविवार दिनांक १० जुलै २०२२

सकाळी १०.०० वाजता – कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या संस्थेच्या 68 वा वर्धापनदिन सोहळ्यास उपस्थिती
स्थळ – कनेडी (ता.कणकवली)

सोईनुसार रत्नागिरीकडे प्रयाण

You cannot copy content of this page