घाट कोसळत असल्याचा आंबोलीतील “तो” व्हिडिओ फेक

पोलिसांनी दिली माहिती

⚡आंबोली ता.०५-: सध्या सोशल मीडिया मध्ये आंबोली घाट कोसळताना एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.मात्र तो दुसराच व्हिडिओ असून आंबोली च्या नावाने सोशल मीडिया मध्ये व्हॉट्स अप वर फिरत आहे.त्यामुळे अनेक ठिकाणाहून खात्री केली जात आहे.याबाबत आंबोली पोलिसांनी सध्या हा दोन दिवसापासून कुठचा तरी व्हिडिओ व्हायरल होत आहे तो आंबोली येथील नाही. पावसाळ्यात अशाप्रकारे व्हिडिओ व्हायरल करत असतात त्यामुळे सोशल मीडियातील अशा प्रकारे खूप अती विश्वास असू नये. आंबोली च्या नावाने असे केल्यास त्याचा परिणाम पर्यटनावर होण्याची शक्यता आहे.असे आंबोली पोलीस दीपक शिंदे अभिजित कांबळे म्हणाले.

सध्या आंबोली घाटातून वाहतूक सुरळीत सुरू आहे.

You cannot copy content of this page