माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी – हडपीडचे पारितोषिक वितरण
⚡कणकवली ता.०६-: कणकवली दहावी परीक्षेत तुम्ही मिळवलेले यश कौतुकास्पद आहे . यापुढील शैक्षणिक प – वासात यशात सातत्य ठेवावे , असे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळ कोळोशी हडपीडचे अध्यक्ष चारुदास इंदप यांनी केले .
माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी – हडपीडचा वार्षिक पारितोषिक वितरण सभारंभ शाळेच्या सभागृहात आयोजित केला होता . या प्रसंगी ते बोलत होते . यावेळी शि . प्र . मंडळाचे कार्याध्यक्ष नारायण सहदेव राणे , कार्यवाह सुरेश राणे , पांडुरंग कदम , संजय नाईक , हडपीडचे सरपंच दाजी राणे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर राणे , सदस्य चंद्रकांत शिंदे , सुभाष इंदप , माजी सरपंच शैलजा गुरव , हेमंत दळवी , मुख्याध्यापक प्रमोद लोके उपस्थित होते . यावेळी दहावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या सानिका इंदप , प्रतीक लडगे , सृष्टी पुजारे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .
आदर्श शिक्षक म्हणून प्रिती देसाई व किरणकुमार पाताडे यांना गौरविण्यात आले . यावेळी किशोर राणे , पांडुरंग कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . प्रतीक लडगे , तन्मय तिवाटणे , तेजस्विनी तांबे , सानिका इंदप यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देण्यात आला . सूत्रसंचालन • आखिनी गर्जे यांनी केले . आभार ज्योती वाडकर यांनी मानले . यावेळी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते .
