आमदार नितेश राणे यांनी केले स्वागत
⚡कणकवली ता.०६-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते ,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना कणकवली येथे राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भेट दिली. भाजपचे आमदार युवा नेते नितेश राणे यांनी त्यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी अमित ठाकरे आणि आमदार नितेश राणे यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली.यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब,किर्तिकुमार शिंदे,प्रशांत कानोजिया आदी उपस्थित होते.
