हडपीड स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्सव

⚡देवगड ता.०६-: देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे १३ जुलै रोजी गुरूपौर्णिमा उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पहाटे ५ ते ६ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मुख्य मुर्तीवर महाअभिषेक, सकाळी ७ ते ८ श्री गणेश पुजन,स्वत्ती पुण्यवाचन,
सकाळी ८ ते ९ श्री स्वामी समर्थ महाराजांची स्वामी भक्तांसोबत नित्य पुजा, सकाळी: ९ ते १० श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण,
सकाळी: ११ ते १२ श्री स्वामी समर्थ महाराजांची महाआरती,
सकाळी १२ वाजता श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड तर्फे दहीबाव दळवी वाडीतील अत्यंत गरीब महिला सौ.पुजा हेमंत दळवी यांना त्यांच्या उदरनिर्वाहानासाठी शिलाई मशीन देण्यात येईल तसेच त्यांचा मुलगा कु.साहील हेमंत दळवी ह्याला संस्थेच्या वतीने त्याच्या शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्याचा शिक्षणाचा सर्व खर्च करण्यात येणार आहे.
दुपारी १ ते ३ वाजता महाप्रसाद होणार आहे. रात्री स्थानिक भजने होतील. उपस्थितीचे आवाहन
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई
संचालीत
श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड
विश्वस्त आणि
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई व श्री स्वामी समर्थ मठ हडपीड गाव समिती यांच्या वतीने अध्यक्ष प्रभाकर राणे, सचिव नंदकुमार पेडणेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page