वादळी वाऱ्याने जामसांडे येथील शेडचे झाले होते नुकसान
देवगड
वादळी हवामानात पत्रे तुटून नादुरुस्त झालेली जामसंडे येथील पिकअप शेडची दुरुस्ती देवगड आगाराच्या पूर्व परवानगीने नंदकुमार घाटे यांनी स्वखर्चाने दुरुस्त करून पत्रे टाकून केली आहे.या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते जगदीश जाधव यांनी या दुरावस्थे बाबत उद्योगपती नंदकुमार घाटे याचेशी चर्चा केली होती .ऐन पावसाळ्यात होणारी प्रवासी वर्गाची गैरसोय त्यामुळे दूर झाली असून प्रवासी वर्गातून उद्योगपती नंदकुमार घाटे,जगदीश जाधव यांना धन्यवाद देत आहेत.या पिकअप शेडची दुरुस्ती व्हावी अशी मागणी आगार व्यवस्थापक यांचेकडे नगरसेविका मनीषा
जामसंडेकर यांनीही लेखी पत्राद्वारे केली होती.
