⚡सावंतवाडी ता.२८-: हरकुळ खुर्द येथे कै.राजाराम मराठे कृषी महाविद्यालयातील कृषिदूतांनी हिरवळीच्या खताची प्रात्यक्षिक दाखवत याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या प्रात्यक्षिकामध्ये गिरीपुष्प या वनस्पतीचा वापर केला असून यातून भरगोस पीक घेण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे
पिकांच्या वाढीसाठी लागणारे सेंद्रिय पदार्थ व अन्नद्रव्यांचा जमिनीतील साठा वाढावाण्यासाठी हिरवे पिक जमिनीत गाडली जातात. त्यामुळे ती जमिनीत कुजतात म्हणजेच त्यांचे विघटन होते आणि त्यातून जे खत तयार होते त्याला हिरवळीचे खत म्हणतात पावसाळ्याच्या सुरुवातीला हिरवळीच्या खताचे बी पेरून ते तयार झाले की ते पिक नांगरणी करून जमिनीत गाडले जाते.
बऱ्याचदा करंज, भेंड, गिरिपुष्प,शेवरी, टाकला या वनस्पतीची पानेही जमिनीत नांगरणी करून गाडली जातात. अशी माहिती हरकुळ खुर्द येथे कै.राजाराम मराठे कृषी महाविद्यालयातील कृषिदूतांनी शेतकऱ्यांना दिली.
यामध्ये किरण राणे,सौरभ आईर , जयदीप बल्लाळ, निखिल घाडी, सर्वेश परब, राहुल होळकर, तम्मय वळंजू , ओंकार शेडगे,संकेत बोभाटे या कृषी दुतांचा समावेश असून त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापक यांचे मार्गर्शन लाभले आहे
यावेळी हरकुळ खुर्द गावचे उपसरपंच संजय रावले,समीर डोंगरे, श्रीकांत दळवी, बंड्या रासम, राजन रासम व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
